Breaking News

पनवेल महापालिका क्षेत्रात मिळणार चांगल्या आरोग्य सुविधा आणि दर्जेदार शिक्षण

विविध विषयांना महासभेची मंजुरी

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिका क्षेत्रात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच भावी पिढीला दर्जेदार आणि उच्च शिक्षण मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे हस्तांतरित  करण्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे क्राँकीटीकरण करणे, निवारा शेड, समाजमंदिरे बांधणे, गटारे बांधणे तसेच तलावाचे सुशोभीकरण करणे, अशा कामांना या वेळी मंजुरी देण्यात आली.

पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. 18) सकाळी 11.30 वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ऑनलाईन झाली. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी, महिला व बाल कल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती अध्यक्ष, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आदी उपस्थित होते.

महापालिका क्षेत्रात वाढती लोकसंख्या पाहता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नऊ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र नव्याने सुरू करण्याच्या विषयांवर सविस्तर चर्चा करून त्याला मंजूरी देण्यात आली. तसेच महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध आरोग्य सोयींनी युक्त असे 100 खाटांचे माता बाल संगोपन व बाल आरोग्य केंद्र उभारण्यास मंजूरी देण्यात आली. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 100 खाटांचे माता संगोपन व बाल-आरोग्य केंद्र उभारणे-सेक्टर 18-प मधील प्लॉट क्रमांक 8 अ, 8ब , क्षेत्र 8 हजार चौरस मीटर (2 एकर) यामध्ये 5600 चौरस मीटर बांधकाम करण्यात येईल त्यासाठी 19 कोटी 60 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी महापालिका क्षेत्रातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शाळा हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागासाठी मनुष्यबळ पुरविणे, यंत्रसामुग्री-वाहने भाडेतत्त्वावर पुरविणे याकरिता ई-टेंडरिंग पध्दतीने निविदा मागविण्याविषयावर चर्चा करताना, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या कर्मचार्‍यांना गणवेश देण्याची आणि यामध्ये 25 टक्के महिला कर्मचारी नेमण्याची केलेल्या सूचनेसह मंजूरी देण्यात आली. 

 महापालिका हद्दीतील कळंबोली, धरणा गाव, नावडे, काळुंद्रे, आडिवली व घोट गाव येथे जलकुंभ बांधण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी मांडलेली मृत सफाई कामगारच्या पगारासंबंधीची लक्षवेधी चर्चेला न घेता  त्यासंबंधी माहिती घेऊन प्रशासनाला त्यावर संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

प्रभाग समिती – अ

1. ओवे गावातील स्मशानभूमी मध्ये नागरिकांच्या निवार्‍यासाठी शेड बांधणे व आसन व्यवस्था

                करणे – 4,24,307 रुपये

2. रांजणपाडा गावातील पाणीपुरवठा करणारी जुनी पाइपलाइन काढून नवी टाकणे – 2,72,427 रुपये

3. डेंगर्‍याचा पाडा गावात कमानी ते गणेश डोंगरे यांच्या घरापर्यंत रस्ता व गटार बांधणे – 18,13,732 रुपये

4. घोट गावात किशोर पाटील ते वासुदेव पाटील यांचे घरापर्यंत आरसीसी गटार व

                काँक्रिटीकरण – 9,94,702 रुपये

5. नागझरी गावात धर्मा पाटील ते मोहन म्हात्रे यांच्या घरापर्यंत  रस्ता काँक्रिटीकरण – 19,42,335 रुपये

6.  नागझरी गावात अरुण म्हात्रे घर ते स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण – 20,68,305 रुपये

7. ओवे कॅम्प गावातील मुख्य रस्ता डांबरीकारण – 62,01,172 रुपये

8. देवीचा पाडा येथे बौध्द स्मशानभूमी ते पप्पू म्हात्रे यांच्या घरापर्यंतचा रस्ता व गटार

                बांधणे – 59,23,077 रुपये

9. घोट गावातील रोहिदास जाधव ते श्री श्रीकृष्ण निघूरकर घरापर्यंत आरसीसी गटार

                बांधणे – 33,72,934 रुपये

10. घोट छळ (गोंधळी पाडा) स्मशानभूमी (एमआयडीसी) रोड ते एकनाथ पाटील घरापर्यंत

                रस्ता काँक्रिटीकरण – 36,28,596 रुपये

11. तोंडरे गाव येथे समाज मंदिर बांधणे – 88,65,293 रुपये

12. तळोजा पाचनंद येथील तलावाचा विकास व सुशोभीकरण – 7,55,63,326 रुपये

13. पिसावे गावातील विहीरीपर्यंत जाण्यासाठी काँक्रिट रस्ता करणे (अ) देऊलपाडा ते पाटील पाडा 

(ब) राजेश म्हात्रे ते विहीर (फणसपाडा) – 16,44,889 रुपये

14. पिसावे गाव येथील राधाकृष्ण मंदिर ते संतोष म्हात्रे घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण – 15,73,427 रुपये

15. पिसावे गावातील कैलास दवणे ते मोतीराम पाटील ते राधाकृष्ण मंदिरपर्यंतचा रस्ता व पाइप

                गटार बांधणे – 14,60,493 रुपये

16. देवीचा पाडा येथे समाज मंदिर बांधणे – 56,54,211 रुपये

17. पालेखुर्द गावातील गणेश मंदिर ते स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे व

                आरसीसी गटार बांधणे – 97,75,606 रुपये

प्रभाग समिती – ब

1. वळवली रस्ता डांबरीकरण करणे – 30,60,393  रुपये

आजच्या महासभेत ग्रामीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले प्रकल्प मंजूर करण्यात आले. नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि माता बाल संगोपन केंद्र मंजूर केल्याने आरोग्याचा दर्जा सुधारणार आहे. 51 जिल्हा परिषदेच्या शाळा हस्तांतर करून घेण्यात येणार आहे. या शाळांचे प्रश्न सोडवण्यासाठी समिती नेमण्यात येणार आहे. पनवेल स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी क्लीनअप मार्शल नेमण्यात येणार असल्याने जनतेला स्वच्छतेची चांगल्याप्रकारे शिस्त लागेल आणि डेमब्रिजच्या गाड्या महापालिका क्षेत्रात खाली करून जाणार्‍या गाड्यांना चाप लागेल त्यामुळे आपले पनवेल स्वच्छ आणि सुंदर होईल. -परेश ठाकूर, सभागृह नेता

आजच्या महासभेतील महत्त्वाचा निर्णय म्हणजे आसूड गावच्या बाजूला सेक्टर 18 मध्ये पनवेल महापालिकेचे हक्काचे असे माता बाल संगोपन व बाल आरोग्य केंद्र उभारण्यास मिळालेली मंजूरी.  प्लॉट उपजिल्हा रुग्णालयासाठी राखीव होता. पनवेलमध्ये एक उपजिल्हा रुग्णालय असल्याने मी आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्याशी चर्चा करून याठिकाणी महिलांसाठी सुसज्ज माता बाल संगोपन व बाल आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी केली होती. माझे ते स्वप्न आज पूर्ण झाले. -महापौर डॉ. कविता चौतमोल

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply