नगरसेविका वृषाली वाघमारे यांची तत्परता
नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त – नवीन पनवेल सेक्टर 13 मध्ये शनिवारी (दि. 27) पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली, त्या वेळी सिडकोचे चारही पंप बंद अवस्थेत होते. प्रभागाच्या नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे तेथे गेल्या असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी
सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना याबाबत माहिती दिली. प्रशांत ठाकूर यांनी हे पंप त्वरित दुरुस्ती करण्याचे आदेश सिडको अधिकारी श्री. फुलारे, नन्हाने यांना दिले. यांनतर तातडीने हे पंप चालू झाले.
या वेळी निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीची सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी पाहणी केली. नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे, वॉर्ड अध्यक्ष विजय म्हात्रे, अॅड. जितेंद्र वाघमारे, ज्येष्ठ नेते जगदीश घरत, विनोद वाघमारे, संदीप नारायण पाटील, सिडकोचे अधिकारी व स्थानिक नागरिक या वेळी
सोबत होते.
गाढी नदीलगत संरक्षण भिंत आहे. त्या ठिकाणीही संरक्षण भिंतीचे दोन दरवाजे तुटले. त्यामुळे पाण्याचा प्रभाव वाढला व सेक्टर 13मध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. लोकांच्या घरात दोनफूट पाणी घरात शिरले आणि रस्त्यावर तीन फूट पाणी होते. नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे व जय बजरंग मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांनी पाण्यात अडकलेल्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.