Breaking News

कृष्णाप्पा गौतमसाठी चेन्नईची सव्वा नऊ कोटींची यशस्वी बोली

मुंबई : प्रतिनिधी
 ख्रिस मॉरिस हा आयपीएलमधला आजवरचा सर्वांत महागडा क्रिकेटर ठरला, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसतानाही कृष्णाप्पा गौतमने आजवरची सर्वांत मोठी बोली लागलेला क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने गौतमवर तब्बल सव्वा नऊ कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली आहे.
कोलकाता आणि हैदराबाद यांच्यामधील चढाओढीने गौतमची किंमत सात कोटींच्या वर पोहचली होती. तिथून कोलकाताने माघार घेतली, पण चेन्नईने या चढाओढीत उशिराने एण्ट्री घेऊन बाजी मारली. 2018 आणि 2019 या दोन मोसमांत राजस्थानकडून खेळलेला गौतम गेल्या मोसमात पंजाबकडून खेळला. ऑफ स्पिन गोलंदाजी ही त्याची खासियत असली तरी हाणामारीच्या षटकांत षटकार ठोकणारा फलंदाज म्हणूनही त्याची दहशत आहे. चेन्नईला रवींद्र जडेजाच्या साथीने असा फलंदाज हवा होता.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply