मुंबई ः प्रतिनिधी
मुंबई इंडियन्ससमोर आयपीएल 2020मध्ये अंतिम फेरीत दिल्लीचा पराभव झाला. स्पर्धेत युवा क्रिकेटपटू श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीने धडाकेबाज कामगिरी केली, मात्र आता दिल्लीच्या स्टार खेळाडूच्या वक्तव्यामुळे टेन्शन वाढले. दिल्लीने कायम राखलेल्या खेळाडूंत दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कगिसो रबाडाचा समावेश आहे. वेगवान गोलंदाजीचा भार त्याच्यावर आहे, पण नुकतेच एका मुलाखतीत त्याने आयपीएलपेक्षा देश महत्त्वाचा असल्याचे सांगितले. जर पाक दौरा आयपीएल वेळापत्रकावेळी असल्यास मी देशाला प्राधान्य देईन. तसे झाल्यास कदाचित पहिला आठवडा मी दिल्लीचा नसेन. मी नंतर संघात दाखल होईन, असे रबाडाने एका मुलाखतीत सांगितले.
श्रेयस अय्यर, शिखर धवन, ऋषभ पंत, कागिसो रबाडा, रविचंद्रन अश्विन अशा काही खेळाडूंनी आपल्या खेळीच्या जोरावर सामने जिंकवून दिले. दिल्लीच्या संघात सुरुवातीला स्थान न मिळालेल्या अजिंक्य रहाणेनेही नंतर आपली प्रतिभा दाखवून दिली. या सार्यांना आयपीएल 2021साठी संघात कायम राखण्यात आले. काही खेळाडूंना लिलावाआधीच करारमुक्त करण्यात आले, तर काहींना लिलावादरम्यान विकत घेण्यात आले आहे.
दिल्लीने कायम राखलेले खेळाडू- शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, अमित मिश्रा, इशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन, ललित यादव, हर्षल पटेल, आवेश खान, प्रवीण दुबे, कागिसो रबाडा, एनरिच नॉर्खिया, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, ख्रिस वोक्स, डॅनियल सॅम्स लिलावात खरेदी केलेले खेळाडू- स्टीव्ह स्मिथ, सॅम बिलिंग्ज, टॉम करन, रिपल पटेल, विष्णू विनोद, उमेश यादव, लुकमन मेरिवाल, एम. सिद्धार्थ.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …