Breaking News

दोन कोटी किमतीचा मांडूळ साप जप्त; खारघर पोलिसांची कारवाई

आरोपी ताब्यात

पनवेल : वार्ताहर

मांडूळ सापामुळे धनदौलत व ऐश्वर्य प्राप्त होते असे लोकांना आमिष दाखवून त्यांना मोठ्या किंमतीत त्याची विक्री करून लोकांची फसवणूक करणार्‍या एका सराईत गुन्हेगारास खारघर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

खारघर परिसरात द क्राऊन बिल्डींगजवळ एक इसम 2 कोटींचा मांडूळ साप विक्रीस घेऊन येणार असल्याची माहिती खारघर पोलिस ठाण्याचे वपोनि शत्रुघ्न माळी यांना मिळताच त्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मपोनि विमल बिडवे, गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र बेलदार व त्यांच्या पथकाने द क्राऊन बिल्डींग से. 15, खारघर येथे सापळा रचून त्या बिल्डींगमधून बाहेर पडणार्‍या आरोपी किशन गोविंद पाटील (वय 40, रा. भिवंडी) या इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडील बॅगची तपासणी केली असता त्याच्या बॅगेत जवळपास 2 कोटींचे मांडूळ साप ज्याचे वजन 5 किले 240 ग्रॅम इतके आहे.

हे ताब्यात घेऊन याबाबत सदर आरोपीविरोधात भादंवि कलम 420, 511 सह वन्यजीव प्राणी 1972 कलम 51, 52 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply