Breaking News

भ्रष्टाचारी सत्ता उलथून टाका भाजप नेते अॅेड. महेश मोहिते यांचे उसरोलीत आवाहन

मुरूड : प्रतिनिधी

उसरोली ग्रामपंचायतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचार करणार्‍यांची सत्ता आहे. या निवडणुकीत भ्रष्टाचार्‍यांची सत्ता उलथवून टाकून, मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन भाजपचे अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी सोमवारी (18 फेब्रुवारी) खारीकवाडा येथे केले. मुुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून, भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवारी अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत खारीकवाडा येथील हनुमान मंदिरात नारळ अर्पूण करण्यात आला. त्या वेळी अ‍ॅड. महेश मोहिते उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असून उसरोलीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, असे त्यांनी सांगितले. आमचे थेट सरपंचपदाचे उमेदवार समीर शिंदे स्वच्छ चारित्र्याचे आणि लोकांशी आदबीने वागणारे आहेत. भाजप उमेदवारांनी घराघरात जाऊन प्रचार करावा आणि सत्ता आपली आहे, विकास कामात भाजप कधीच कमी पडणार नाही, असा लोकांना विश्वास द्यावा, असे अ‍ॅड. मोहिते म्हणाले. उसरोली ग्रामपंचायतचे थेट सरपंचपदाचे भाजपचे उमेदवार समीर शिंदे, ग्रामपंचायत सदस्य पदासाठीचे भाजप उमेदवार अनिल नांदगावकर, सुनीता गिरणेकर, सरिता माळी, संकेष पाटील, इंदिरा वाडकर, विनायक शेडगे, वैशाली जाधव, रूपेश पाटील, स्वाती मिटकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर सर्व उमेदवारांनी अ‍ॅड. महेश मोहिते यांच्यासमवेत घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.

Check Also

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …

Leave a Reply