एक लाख 13 हजारांचा ऐवज हस्तगत
अलिबाग ़: प्रतिनिधी
रायगड, मुबई व ठाणे जिल्ह्यात घरफोडी करणार्या दोघांना रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) जेरबंद केले. शाकीर हैदर शेख (वय 42, रा. मुंब्रा) व अकबर नुरमहमद पटेल (वय 42 कणकवली) अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून उघडकीस आलेल्या गुन्ह्यामधील चोरीस गेलेले 31 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व तीन मोबाईल असा एकूण एक लाख 13 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
माणगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचा गुन्हा दखल होता. याचा तापस करण्याचे आदेश रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक सचीन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी तपासाला वेग दिला. त्यांनी एक पथक नेमले. मिळालेल्या माहितीनुसार या पथकाने सापळा रचून शाकीर हैदर शेख आणि अकबर नुरमहमद पटेल यांना अटक केली. त्यांनी माणगांव, कोलाड, महाड शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडून मुंबईतील गोरेगाव व विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गुन्ह्यांची माहिती मिळाली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. नावले, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. पोमण, सहाय्यक फौजदार राजेंद्र मांडे, पोलीस हवालदार राजेंद्र दुसाने, पोलीस हवालदार राजेश पाटील, अजय मोहिते, सचिन शेलार, पोलीस नाईक प्रतिक सावंत, सुनील खराटे, पोलीस शिपाई विशाल आवळे, पोलीस हवालदार देवा कोरम व महिला पोलीस नायक अभियंती मोकल यांच्या पथकाने ही कामगिरी केली.