Breaking News

विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याने रस्त्यावरील मॅनहोलचे काम पूर्ण

पनवेल : वार्ताहर

शहरातील स्वामी नित्यानंद मार्गावरील मुख्य रस्त्यावर मॅनहोल कव्हर तुटल्यामुळे वाहतुकीस खोळंबा होत होता. ही बाब पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विक्रांत पाटील यांना समजताच त्यांनी तत्काळ स्वत: उपस्थित राहून मॅनहोलचे काम पूर्ण करून घेतले.

स्वामी नित्यानंद मार्गावरील मॅनहोल कव्हर तुटल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. संभाव्य धोका लक्षात घेता नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्वरित मॅनहोल कव्हर करून दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावून घेतले. पालिका अधिकार्‍यांशी फोन वर संपर्क साधला, त्वरीत नवीन मॅनहोल कव्हर मागवता येणार नाही आणि काम दुसर्‍या दिवशी होईल असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले, पण नगरसेवक विक्रांत पाटील यांनी अधिकार्‍यांना विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले आणि त्वरित मॅनहोल कव्हर मागवून घेतले व प्रत्यक्ष उभे राहून कव्हर लावून घेतले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्परतेने मॅनहोल कव्हर लावून घेतल्या बद्दल प्रभागातील नागरिक समाधान व्यक्त केले आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply