Breaking News

पनवेलमध्ये आज होणार महिलांचा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त

येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल मीडिया प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 70 महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. पनवेलच्या मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सोमवारी (दि. 8) सकाळी 10.30 वाजता होणार्‍या कर्तृत्ववान महिला गौरव समारंभास लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येेष्ठ पत्रकार व साहित्यिक निला उपाध्ये, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आदिती सारंगधर, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. या महिला गौरव समारंभात समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जाणार आहे. वैद्यकीय, वकील, स्वच्छतादूत, परिचारिका, समाजसेवा, साहित्य, शिक्षक, एसटी वाहक, रिक्षाचालक, पिग्मी एजंट आदी क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पनवेल मीडिया प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार गणेश कोळी यांनी दिली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply