नाशिक : प्रतिनिधी
नाशिक येथे 26 ते 28 मार्चदरम्यान होणारे 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय अखिल भारतीय साहित्य महामंडळाने घेतला आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी रविवारी (दि. 7) एका पत्रकान्वये ही घोषणा केली. कोरोनामुळे यंदा संमेलन घ्यायचे नाही, असे महामंडळाने ठरविले होते, परंतु नोव्हेंबर 2020च्या मध्यापासून कोरोना संक्रमण कमी झाले. डिसेंबरमध्ये ते आटोक्यात आले असे चित्र निर्माण झाले. त्यामुळे साहित्य महामंडळाने नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून साहित्य संमेलन घेण्याचे जाहीर केले होते. संमेलनाची तयारी सुरू असताना कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. त्यामुळे साहित्य संमेलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय महामंडळानेे घेतला आहे.