Breaking News

सांगडेत पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन, आरिवली येथे रस्त्याचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील सांगडे येथे पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन आणि आरिवली येथे डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचे लोकार्पण भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 14) करण्यात आले. सांगडे येथे रायगड जिल्हा परिषद राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत जलकुंभ नळ योजनेतून पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. त्याचा भूमिपूजन कार्यक्रम भाजप सांगडेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता, तर आरिवली फाटा ते आरिवली गावादरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण काम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पळस्पे विभागीत अध्यक्ष अनेश ढवळे, अप्पा भागीत, राम गोजे, आत्माराम गोजे, महेंद्र गोजे, सदाशिव गोजे, संदेश गोजे, नितीन लबडे, अनंता पाटील, बारकू गोजे, हरिभाऊ पाटील, लता पाटील, प्रकाश गोजे, सुमित गोजे, विश्वनाथ पाटील, सुरेश लखाबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी अरुणशेठ भगत यांनी मनोगत व्यक्त केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply