धाटाव, रोहा ः प्रतिनिधी
रोहा तालुक्यात वाशी गावातील काही लहान मुले शनिवारी (दि. 27) सकाळी 12 वाजेदरम्यान गणपतीच्या डोहाजवळ नदीवर पोहायला गेली होती. या वेळी नदीपात्रात खोल पाण्याचा डोह असल्याने अंदाज न आल्याने दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे वाशी गावासह रोहा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
शाळेला सुटी असल्याने गावातील लहान मुले वाशी गावाच्या हद्दीतील गणपतीच्या डोहाजवळ पोहण्यासाठी गेली होती. पोहताना आपल्यातील दोन मुले पाण्याखालीच राहिल्याने इतर मुले घाबरून त्यांनी याबाबत गावात कळविले. गावातील तरुणाने तत्काळ नदीच्या दिशेने धाव घेतली. बुडालेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना रोह्यातील खासगी दवाखान्यात नेले असता डॉ. जाधव यांनी त्यांना मृत घोषित केले. वेदांत मनोज मगर (10, रा. वाशी) आणि किसन खडकसिंग खडका (12, रा. वाशी) अशी मृत मुलांची नावे आहेत. दोन्ही मुलांचे मृतदेह रोहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा अधिक तपास रोहा पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर व त्यांचे सहकारी करीत आहेत.
Check Also
आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …