रोहा तालुक्यात दोन कोरोनाबाधित आढळले
रोहे ः प्रतिनिधी
तालुक्यात कोरोनाचे रूग्ण रोज सापडत असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मंगळवारी रोहा तालुक्यात कोरोनाचे दोन रूग्ण सापडले असून सहा व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. रोहा तालुक्यात सध्या 32कोरोना सक्रिय रूग्ण असून, ते विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत.
फेबुवारीमध्ये कोरोनाचे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या पाचवर आली होती. त्यानंतर मात्र तालुक्यात कोरोना रूग्ण वाढण्यास सुरूवात झाली. मंगळवारी
(दि. 9) दोन कोरोना बाधीत व्यक्ती सापडल्या असून, आतापर्यंत कोरोना रूग्णांची एकूण संख्या 2615वर पोहचली.
मंगळवारी सहा व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत रोहा तालुक्यात 2491 व्यक्तींनी कोरोना वर मात केली आहे. तालुक्यात आतापर्यंत 92 व्यक्तींना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहे.
सुधागड तालुक्यात 13 सक्रिय कोरोना रुग्ण
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुका दोन आठवड्यापूर्वी कोरोनामुक्त झाला होता, मात्र आता तालुक्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने नागरिक धास्तावले आहेत. तालुक्यात सध्या तब्बल 13 सक्रिय रुग्ण आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांच्याकडून मंगळवारी सायंकाळी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात पाच नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत.
सध्या सुधागड तालुक्यात कोरोनाचे 13 सक्रिय रुग्ण असून यातील 11 रुग्ण गृहविलगीकरणमध्ये तर दोन रुग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती डॉ. शशिकांत मढवी यांनी दिली.
सुधागड तालुक्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 466 रुग्ण झाले असून त्यापैकी 427 रुग्ण बरे झाले आहेत तर26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहितीदेखील डॉ. मढवी यांनी दिली. नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करून योग्य खबरदारी घ्यावी व अफवांना बळी पडू नये, असे आवाहन डॉ. मढवी यांनी केले आहे.