Breaking News

देवेंद्र फडणवीसांकडून गृहमंत्र्यांविरोधात हक्कभंग

मुंबई ः अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी झालेल्या आरोपानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात हक्कभंग आणला. यासोबतच फडणवीसांनी मराठा आरक्षणावरून काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधातही हक्कभंगाची नोटीस दिली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाची सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) चौकशी करीत आहे. त्याचवेळी कारचे मालक मनसुख हिरेन यांचा झालेला मृत्यू हत्या की आत्महत्या याचा तपास राज्यातील दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करीत आहे. याच मुद्द्यावरून अधिवेशनात वातावरण तापले होते. याबाबत मुंबईतील विधान भवन येथे मुंबई पत्रकारांशी बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक प्रकरणात काल काही आरोप केले होते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात स्वयंस्पष्ट अभिप्राय नोंदवले आहेत. त्यामुळे त्यांनी खोटे आरोप करून सुप्रीम कोर्टाचासुद्धा अवमान केला आहे. प्रथमदर्शनी या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार दिसून येत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा अभिप्राय आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. शिवाय ही बाब आपण काल निदर्शनास आणून दिल्यानंतरसुद्धा ते वारंवार तेच बोलत राहिले. असे करून अनिल देशमुख यांनी माझ्या बोलण्यावर बंधने आणून माझा विशेषाधिकार भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी, अशी मागणी मी सभागृहात केली आहे.अशोक चव्हाण यांच्याविरोधातही देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंगाची नोटीस बजावली आहे. मराठा आरक्षणावर अशोक चव्हाण यांनी अतिशय दिशाभूल करणारे निवेदन सभागृहात केले. 102व्या घटनादुरुस्तीचा उल्लेख हा सर्वोच्च न्यायालयात मुकुल रोहतगी यांनी केला होता. केंद्र सरकारच्या वतीने अटर्नी जनरल यांनी जे सांगितले नाही, ते त्यांनी सभागृहात सांगितले. 102व्या घटनादुरुस्तीचा महाराष्ट्राच्या कायद्यावर परिणाम होणार नाही हे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. त्यावर दोन पाने लिहिली आहेत, मात्र या सर्व बाबी विचारात न घेता अशोक चव्हाण महाराष्ट्राची आणि मराठा समाजाची दिशाभूल करताना स्वतःच्या अज्ञानाचे प्रदर्शन करीत आहेत, असे फडणवीस या वेळी म्हणाले.

सचिन वाझे तुमचा जावई आहे का? -दरेकर

मनसुख हिरेन प्रकरणात ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या नष्ट करण्यासाठी सरकार संधी देत आहे. राज्यातील जनतेचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. कोण लागून गेला सचिन वाझे? तुमचा जावई आहे का सभापती महोदय? का हे सरकार त्याला पाठीशी घालत आहे?, अशा सवालांच्या फैरी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या वेळी झाडल्या.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply