पनवेल : येथील महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात गुरुवारी 125 कोरोना रुग्ण आढळले असून, या आठवड्यात सतत 90पेक्षा जास्त रुग्ण आढळत असल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी महापालिका हद्दीतील कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण वा सेवा वगळता 12 ते 22 मार्च या कालावधीत रात्री 11 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. यामधून जीवनावश्यक वस्तू (दूध, भाजीपाला, फळे इत्यादी), वृत्तपत्र सेवा व अत्यावश्यक सेवा पुरवणार्या आस्थापना, व्यक्तींना व त्यांच्या वाहनांना वगळण्यात आले आहे. या 10 दिवसांच्या कालावधीत शाळाही बंद ठेवण्यात येणार आहेत.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …