रेवदंडा : प्रतिनिधी : अलिबाग तालुक्याती आंदोशी येथे रेवदंडा पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकून पाच जणांना अटक करण्यात आले. आंदोशी येथे जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती रेवदंडा पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलीस निरिक्षक सुनिल जैतापुरकर यांच्यासह पोलीस नाईक संतोष पवार, सुशांत भोईर, आणि पोलीस कर्मचारी धर्मेद्र म्हात्रे, अशोक पाटील यांनी आंदोशी जंगल भागात चालविण्यात येत असलेल्या जुगार अड्डयावर धाड टाकली. यावेळी एकूण 1 लाख 28 हजार 760 रुपये जप्त करुन रेवदंडा पोलिसांनी पाच जणांना अटक केली.या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार श्री. म्हात्रे करीत आहेत.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper