Breaking News

अशोक बागमध्ये बसविले नवीन ड्रेनेज लाईन व चेंबर्स

नगरसेवक विक्रांत पाटील यांचे प्रयत्न

पनवेल : वार्ताहर

पनवेलमधील विरुपक्ष हॉल समोरील अशोक बाग येथे नवीन ड्रेनेज लाईन व चेंबर्स बसवून देण्यात आले आहेत. यासंबंधी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी येथील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून त्वरीत पाठपुरावा केला होता. त्यामुळे अशोग बाग येथील नागरिकांनी विक्रांत पाटील आभार व्यक्त केले आहे.

विरुपक्ष हॉल समोरील अशोक बागमध्ये राहणार्‍या रहिवाशांनी आपल्या ड्रेनेज लाईनच्या समस्येबद्दल नगरसेवक विक्रांत पाटील यांची भेट घेतली होती.

ड्रेनेज लाईन ह्या जुन्या झाल्या आहेत आणि सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणामुळे ड्रेनेज लाईन माती खाली दबल्यामुळे फुटली होती. यामुळे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यामुळे आजूबाजूला दुर्गंधी पसरली होती. घरात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरीक असल्यामुळे त्यांच्या आरोग्यवर याचा परिणाम होत होता.

नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्वरित कॉन्ट्रॅक्टरला सांगून नवीन ड्रेनेज लाईन टाकून घेतली व तीन नवीन चेंबर्स पण बांधून दिले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply