Breaking News

पनवेल, उरण तालुक्यात शांततेत मतदान

थेट सरपंचांसह सदस्यांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यात मुदत संपलेल्या 17 ग्रामपंचायतींसाठी तर उरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान प्रक्रिया झाली. पनवेल व उरण तालुक्यात मतदान प्रक्रियेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आता सोमवारी (दि. 6) मतमोजणी होणार असल्याने सर्वत्र उत्सुकता वाढली आहे.
पनवेल तालुक्यातील दापोली, चिखले, विचुंबे, ओवळे, भिंगार, वावेघर, कोन, गुळसुंदे, दुंदरे, देवद, सोमाटणे, गिरवले, कळसखंड, न्हावे व तुराडे, मालडुंगे या ग्रामपंचायतींसाठी 47 सरपंच आणि 360 सदस्यपदांसाठी उमेदवार रिंगणात आहेत.
तहसीलदार विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 73 मतदान केंद्रांवर नियोजन पूर्ण करण्यात आले होते. तालुक्यातील एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही.
या निवडणुकीत सरपंचपदाच्या 17 जागांसाठी 47 तर 175 सदस्यपदासाठी 360 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. निवडणुकीसाठी तहसीलदार विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एका मतदान केंद्र अधीक्षक, तीन मतदान अधिकारी, 17 निवडणूक निर्णय अधिकारी याप्रमाणे एकूण 365 अधिकारी व कर्मचारी सज्ज होते.
उरण तालुक्यात जासई, चिरनेर व दिघोडे या तीन ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. आता सोमवारी निकाल लागणार असून सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

पोलीस बंदोबस्त

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ 2 कार्यक्षेत्रात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सहाय्यक पोलीस आयुक्त, 10 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 50 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 360 अंमलदार तसेच चार स्ट्रायकिंग फोर्स व दोन राखीव स्ट्रायकिंग फोर्स प्रत्येक ग्रामपंचायतीच्या हद्दीत तैनात होते.

Check Also

लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही -खासदार श्रीरंग बारणे

पनवेल : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता …

Leave a Reply