Breaking News

महाशिवरात्रीनिमित्त बेलाच्या रोपांची लागवड आणि वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

महाशिवरात्रीचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेच्या वतीने  पनवेल, पेण, अलिबाग येथे महाशिवरात्र व आयुर्वेद विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी संस्थेच्या वतीने बेलाची रोपे वाटप व लावण्यात आली.

संस्थेच्या या जनजागृती कार्यक्रमात वनौषधी तज्ञ सुधीर पाटील यांनी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, महाशिवरात्रीला महादेवास बिल्वपत्र, बिल्वफळ, धोत्रा फुल- फळ, कवठ, आंबा मोहर, पळसफुले, वाहतात. मानवी जीवनात या पाना-फुलांना एक उच्च स्थान आहे. यामध्ये अनेक औषधी गुण पाहूनच त्यांचा समाविष्ट ऋषीमुनींनी ईश्वर पुजेकरीता केला.

देवाला वाहण्याच्या निमित्ताने या वनस्पती सहज हाताळल्या जाऊन त्यांच्या गुणांचा माणसाला निश्चितच फायदा होतो. या पाना-फुलांना नुसतेच धार्मिक महत्त्व नाही, तर आयुर्वेदिक सुद्धा खूपच महत्व आहे.

या कार्यक्रमात सुधीर पाटील यांनी कवठ, आंबा मोहर, धोत्रा, पळसफुले, बेल यांच्या औषधी गुणधर्मांची माहिती दिली. या वेळी मनस्वी घरत, आर्या पाटील यांच्या हस्ते महाशिवरात्र व आयुर्वेद या विषयांवर आधारित असलेली पत्रके वाटप करण्यात आली. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास शिवभक्तांचा उदंड प्रतिसाद लाभला.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply