उत्तर रायगड जिल्हा कार्य समितीच्या बैठकीत नियुक्ती
पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्य समितीची बैठक शनिवारी (दि. 13) पनवेलच्या मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झाली. या वेळी भाजप खालापूर तालुका मंडल अध्यक्षपदी रामदास सखाराम ठोंबरे यांची निवड करण्यात आली.
या बैठकीला भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, नंदकुमार पटवर्धन, अविनाश कोळी, दीपक बेहरे, विनोद साबळे, मयुरेश नेतकर, अश्विनी पाटील, विठ्ठल मोरे, अविनाश पुरी, सर्व सेलचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. रामदास ठोंबरे यांच्या नियुक्तीबद्दल मान्यवरांसह पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.