सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’च्या प्रभाग समिती कार्यालयात सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. 1) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये प्रभागांमध्ये स्वच्छता, धूर फवारणी, अतिक्रमण, गटारे, फवारणी यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’मधील प्रभाग क्रमांक 17,18,19 आणि 20 मधील स्वच्छता, धूर फवारणी, अतिक्रमण, गटारे, त्याचबरोबर इतर कामांविषयी सखोल चर्चा करण्यासाठी करुन त्यांचा आढावा घेण्यात आला. या झालेल्या बैठकीचे एक महिन्यानंतर बैठक घेऊन प्रशासनाच्या वतीने या संदर्भात कोणती अंमलबजावणी करण्यात आली याची माहिती घेण्यात येणार आहे.
या बैठकीला भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती सुशिला घरत, नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नितीन पाटील, अजय बहिरा, तेजस कांडपीळे, नगरसेविका दर्शना भोईर, वृषाली वाघमारे, रूचिता लोंढे, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.