खोपोली : प्रतिनिधी
सध्याच्या परिस्थितीत महिलांवरील अत्याचार वाढत असल्याने याबाबत समाजामध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणे, पाल्यांवर संस्कार करणे ही जबाबदारी घरच्या महिलांवर येऊन पडली असल्याचे प्रतिपादन खोपोली इन्हरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा राज नहर यांनी येथे केले.
जागतीक महिला दिनानिमित्त भाजप महिला मोर्चाच्या वतीने सोमवारी (दि. 15) आयोजित केलेल्या कार्यक्रमात महिला सुरक्षा संवाद या विषयावर राज नहर बोलत होत्या. शिक्षणासाठी आपण पाल्याच्या हातात मोबाइल देत आहोत, पण त्याचा दुरुपयोग तर होत नाही ना, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.
महिलांकडे पाहण्याचा समाजाचा द़ृष्टिकोन सकारात्मक असावा, महिलांनी राजकारणात, समाजकारणात पुढे येणे काळाची गरज आहे. मात्र आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होता कामा नये, असे महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनीताई पाटील यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निशा दळवी यांनी केले. या वेळी महिलांसाठी विविध स्पर्धां घेण्यात आल्या.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस दिपक बेहरे यांच्या विशेष उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेविका अपर्णा मोरे, महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस मृणाल खेडकर, खोपोली शहर अध्यक्षा शोभा काटे, कर्जत शहर सरचिटणीस वर्षा बोराडे, स्नेहल सावंत, रसिका शेटे, अनिता शहा, स्वाती बिवरे, सुनिता पाटणकर, सुमिती महर्षी, अपर्णा साठे, विनया परदेशी, अनिता प्रधान, विमाल गुप्ते, सुरेखा गांधी तसेच भाजपचे शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, हेमंत नांदे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.