Breaking News

केळवणे पूरबाधितांना आर्थिक मदत ; भाजप नेते महेश बालदी यांची सामाजिक बांधिलकी

पनवेल : रामप्रहर वृत्त

अतिवृष्टीमुळे घरात पुराचे पाणी शिरून नुकसान झालेल्या केळवणे येथील 60 कुटुंबांना भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी आर्थिक मदत केली आहे. या पूरग्रस्तांना सामाजिक बांधिलकीतून घरटी दोन हजार रुपये देण्यात आले.

पनवेल तालुक्यातील केळवणे गावात पूरस्थिती निर्माण होऊन अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. या पार्श्वभूमीवर भाजप नेते महेश बालदी यांनी स्थानिक कार्यकर्त्यांमार्फत नुकसानीचा आढावा घेतला आणि पूरबाधित कुटुंबांना घरटी प्रत्येकी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार रविवारी (दि. 11) मदतीचे वितरण करण्यात आले. केळवणे ग्रामस्थांना मदत देतेवेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या मदतीबद्दल ग्रामस्थांनी महेश बालदी यांचे आभार मानले आहेत.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply