Breaking News

विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का

शिवसेनेच्या शैला गोडसे यांनी भरला उमेदवारी अर्ज

पंढरपूर ः प्रतिनिधी
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी येथे बंडाचे निशाण फडकावले असून, शुक्रवारी (दि. 26) बैलगाडीतून वाजत गाजत येत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
शैला गोडसे या गेल्या विधानसभा निवडणुकीपासून उमेदवारी मागत होत्या, मात्र गेल्या वेळीही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. आता पोटनिवडणुकी रणधुमाळी सुरू असतानाच त्यांनी बंड पुकारत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली आहे. गोडसे या सोलापूर जिल्हा परिषद सदस्य असून, वाडीवस्त्यांपर्यंत त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. जनतेच्या रेट्यामुळेच आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्यावेळी उमेदवारी डावलल्यावरही मी पक्षादेश मनाला होता. यंदादेखील शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष या दोघांचीही भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी जनता आणि कार्यकर्ते यांचा आग्रह असल्याने आपण अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. या वेळी त्यांनी शक्तिप्रदर्शन केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसपुढे वेगळेच आव्हान उभे ठाकले आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply