पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी साजरी करण्यास उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध घालण्यात आले होते. तरीही ज्या गृहनिर्माण सोसायट्यांनी गर्दीबाबतचे नियम पाळले नाहीत त्यांच्यावर महापालिकेने रविवारी कारवाई केली आहे. महापालिका हद्दीत कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे होळी साजरी करण्यास उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध घालण्यात आले होते. रविवारी (दि. 28) खारघरमधील दोन सोसायट्यांमध्ये गर्दी हटवून होळीचा कार्यक्रम बंद करण्यात आला. या सोसायट्यांवर गर्दीबाबतचे नियम पाळले नाहीत म्हणून कारवाई करण्यात आली. पनवेल शहरातील तक्का येथे होळीसाठी लोकांनी गर्दी केली होती. तेथे अतिक्रमण विभागाने गर्दी हटवून होळीचा कार्यक्रम बंद करण्यात आला. तसेच लाइनआळी येथे होळी साजरी करण्यासाठी गर्दी केली होती. ती हटवून होळीचा कार्यक्रम बंद करण्यात आला. कळंबोली आणि कामोठे येथे रस्त्यावर उतरून लोकांना होळी साजरी करू दिली नाही. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात होळी साजरी करताना गर्दी करू नये, कोरोनाच्या नियमांचे पालन करावे अशा सूचना केल्या होत्या. तरीही काही सोसायट्यांनी याकडे दुर्लक्ष करत गर्दी केली होती, अशा सोसायट्यांवर कारवाई करण्यात आली.