Breaking News

कोरोनाचे रुग्ण घरीच घेताहेत उपचार

खारघर : प्रतिनिधी

कोरोनाला वर्षपूर्ती झाली असली तरी कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, मात्र एक दिलासादायक बाब समोर आली असुन कोरोना बाधित रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या पालिका क्षेत्रात 2400 कोविड बाधित रुग्ण असुन यापैकी केवळ 230 रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोना आजार बरा होत असून मोठ्या संख्येने कोरोना बाधित घरीच बरे होत आहेत.

कोविडच्या सुरुवातीच्या कार्यकाळात कोविडबाबत प्रचंड भीती निर्माण झाली होती. प्रत्येक जण कोविडची बाधा होताच रुग्णालयात धाव घेत होता. अशा परिस्थितीत सरकारी रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांत मोठ्या जिकरीने रुग्णांना बेड मिळत असे. रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीत राहिल्याशिवाय आपण बरे होणार नाही.अशी भावना अनेकांची झाली होती, मात्र वर्षपूर्तीनंतर कोरोना हा आजार बरा होतो ही भावना नागरिकांमध्ये तयार झाल्याने रुग्णालयापेक्षा घरीदेखील आजार बरा होत असल्याने मोठ्या संख्येने कोरोना बाधित घरीच उपचार घेत आहेत. घरी उपचार घेणार्‍या रुग्णांची टक्केवारी तब्बल 87 टक्के आहे. कोविडची साथ नियंत्रणात आणण्यासाठी शासनामार्फत विविध प्रयत्न सुरू आहेत. पालिका क्षेत्रात रात्री संचार बंदीदेखील सुरू झाली असुन नागरिकांनी शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे, मात्र कोरोनाबाबत लोकांची सकारात्मक मानसिकता तयार होत असुन घरी होम क्वारंटाइन रुग्ण मोठ्या संख्येने बरे होत आहेत.

पालिका क्षेत्रातील विद्यमान रुग्ण-2400

रुग्णालयात उपचार घेणारे-230

घरी उपचार घेणारे रुग्ण-2170

कोरोना आजार बरा होतो. कोविडची लक्षणे निदर्शनास आल्यास तत्काळ वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सल्ला घ्यावा. लक्षणे आढळल्यास ती अंगावर न काढल्यास कोविडमधून आपली नक्कीच मुक्तता होईल.

-डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय अधिकारी, पनवेल महापालिका

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply