Breaking News

सायकलपटू आदिलचा नवा विक्रम

काश्मीर ते कन्याकुमारी अंतर कमी वेळेत पार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
काश्मीरच्या बारामुल्ला येथील 23 वर्षीय सायकलपटू आदिल तेलीने गिनिज बुकमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे. आदिलने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा म्हणजेच 3600 किमीचा प्रवास आठ दिवस दीड तासात पूर्ण केला. त्याने नाशिकच्या 17 वर्षीय ओम महाजनला मागे टाकले. ओमने नोव्हेंबर 2020मध्ये हाच प्रवास आठ दिवस सात तास आणि 38 मिनिटांत पूर्ण केला होता.
आदिलने 22 मार्च रोजी सकाळी 7 वाजता श्रीनगरच्या लाल चौकातील क्लॉक टॉवर येथून प्रवासाची सुरुवात केली. 30 मार्च रोजी सकाळी 8 वाजता त्याने आपले लक्ष्य गाठले.
दरम्यान, आदिलने राज्यस्तरावर आणि काश्मीर विद्यापीठासाठी अनेकदा चांगली कामगिरी केली आहे. त्याने श्रीनगर ते लेहदरम्यानचे 44 किमी अंतर 26 तास 30 मिनिटांत पार केले होते.

Check Also

अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….

काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …

Leave a Reply