Breaking News

नियमांचे पालन करून शिवशक्ती मित्रमंडळातर्फे होळी, धूलिवंदन

पनवेल : वार्ताहर

महाराष्ट्र शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाच्या अनुषंगाने कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून शहरातील 100 वर्षे जुन्या असलेल्या शिवशक्ती मित्रमंडळाने होळी व धूलिवंदन उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा केला.

होळी व धूलिवंदन उत्सव साजरा करण्यासाठी पोलीस खात्यातून सुद्धा काही दबाव टाकण्यात आला होता, परंतु आमचे पारंपारिक उत्सव आम्ही नियमात बसून साजरे करू व कोणताही त्रास शासन यंत्रणेला होणार नाही, अशी ग्वाही या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. नगरसेवक रमेश गुडेकर यांनी दिली व त्याचा परिणाम म्हणजे शिवशक्ती मित्रमंडळानुसार अनेक मंडळांनी आपला पारंपारिक होळी सण साजरा केला.

या मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी कोरोना काळात मदतीचा हात पनवेलकरांना दिला. या वेळी सुद्धा त्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने होळी सण साजरा करताना समाजातील महत्त्वाचे घटक असलेले भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांचे पनवेलकरांना कोरोनाचे जनजागृती व्हिडीओ दर्शनी भागात लावून त्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन सुद्धा केले होते. या उपक्रमाचे समाजातील सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply