Breaking News

वळके येथे गुढीपाडवा शोभायात्रा

मुरुड : प्रतिनिधी

जगद्गुरू श्री नरेंद्रचार्य महाराज दक्षिण पीठ नाणीज धाम येथील दक्षिण रायगड विभागातर्फे वळके येथे गुढी पाडव्या निमित्ताने हिंदू नववर्षाच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.आज सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी  वळके हायस्कूल येथून जगद्गुरू श्री नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नाम गाजराचा जयघोष करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.या मिरवणुकीत डोक्यावर कळश्या घेतलेल्या महिला,तसेच गुढी घेऊन महिला व पुरुष तसेच भगवे झेंडे घेऊन असंख्य भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी  झाले होते.

या वेळी पारंपरिक वाजंत्री,बेंजो पथक या वाद्यांचा जल्लोष दिसून आला.त्याच प्रमाणे जगद्गुरू श्री नरेंद्रचार्य महाराज यांची प्रतिमा असलेला रथ व या रथाच्या पुढे भजन मंडळ यांच्या सुमधुर आवाजाने विविध भजने अश्या जल्लोषात मिरवणूक संपूर्ण वळके गावात फिरवण्यात आली.  या निघालेल्या शोभा यात्रेत सुमारे 550 भक्त गण सहभागी झाले होते.   या शोभा यात्रेचे नियोजन मुरुड तालुका सेवा समिती व सेवा केंद्र वळके भक्त गण यांनी केले होते.

या वेळी श्री संप्रदाय दक्षिण रायगड जिल्हा सेवा अध्यक्ष दीपक पाटील श्री संप्रदायचे मुरुड तालुका सेवा अध्यक्ष बाबा डयला, संतोष चोरघे, मधुकर मोकल, संतोष घाग, जितेंद्र दोषी, महेश मोठेबूवा, जनार्दन भगत, सिद्धेश सागवेकर, मोहन म्हात्रे,चंद्रकांत लोणशीकर, किशोर भगत आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply