Breaking News

राजकारणी आणि संपादक  यामध्ये संजय राऊतांची गल्लत

बाळासाहेब थोरातांचा टोला

मुंबई ः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे अध्यक्षपद देण्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसमध्ये नाराजी आहे. अशातच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊतांची राजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत होत असल्याचा टोला लगावला आहे.
थोरात म्हणाले की, यूपीएचे नेतृत्व सोनिया गांधीच करणार आहेत. शेवटी काँग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे. कदाचित अडचणीच्या काळातून जात असेल, मात्र देशाचे नेतृत्व काँग्रेसकडे आहे आणि त्यांच्याकडेच राहणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी अशी कल्पना मांडणे मला योग्य वाटत नाही. असे वक्तव्य करून मनात दोष निर्माण होतो. हे त्यांनी करू नये.
यापूर्वी शरद पवार यांच्याकडे यूपीएचे अध्यक्षपद देण्याच्या संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते हुसेन दलवाई, प्रवक्ते सचिन सांवत आदी नेत्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. पटोले यांनी संजय राऊत शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का, अशी विचारणा केली होती, तर दलवाईंनी संजय राऊत शिवसेनेत आहेत की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असा सवाल केला होता, तसेच राऊत यांच्या या वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नसल्याचेही संतप्तपणे म्हटले होते.  

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply