Breaking News

सचिन वाझे वापरत असलेली आणखी एक अलिशान कार जप्त

नवी मुंबई ः प्रतिनिधी
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांच्या चौकशीमध्ये आतापर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एएनआय) पाच गाड्या जप्त केल्या आहेत. आता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून आऊटलँडर ही सहावी गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. कामोठ्यातील शीतलधारा सोसायटी आवारात एमएच 01-एएक्स 2627 या क्रमांकाची गाडी जप्त केली गेली आहे.
कामोठ्यातील ही गाडी बरेच दिवस गाडी वापरात नसल्याने स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. एनआयएची एक टीम घटनास्थळी पोहचली असून, अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, आतापर्यंत एनआयएला वाझे यांच्याशी संबंधित दोन मर्सिडीज, एक प्राडो, इनोव्हा, स्फोटक आढळलेली स्कॉर्पिओ आणि नुकतीच ताब्यात घेतलेली आऊटलँडर अशा सहा गाड्या सापडलेल्या आहेत. एनआयए या सहा गाड्यांच्या व्यतिरिक्त अजून एक आऊटलँडर, ऑडी आणि स्कोडा गाडीच्या शोधात आहे.
‘ती’ नंबर प्लेट औरंगाबादमधून चोरी गेलेल्या कारची
मुंबई ः मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी तपास करीत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) रविवारी बीकेसी परिसरात मिठी नदीच्या पात्रात शोध मोहीम राबवली. या वेळी नदी पात्रातून एक कॉम्प्युटर, सीपीयू, दोन नंबर प्लेट्स आणि आणि अन्य साहित्य हाती लागले. यामुळे एनआयएच्या हाती आता या प्रकरणाशी निगडीत मोठे धागेदोरे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर या वेळी सापडलेली एमएएच-20 एफपी 1539 ही नंबरप्लेट ही औरंगाबादमधील एका व्यक्तीच्या चोरी गेलेल्या कारची असल्याची माहिती आता समोर आली आहे. औरंगाबादमधील हडको एन 12 छत्रपती नगर येथील रहिवासी असलेले विजय मधुकर नाडे यांनी ही नंबर प्लेट आपल्या चोरी गेलेल्या कारची असल्याचा दावा केला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply