Breaking News

कामोठ्यात ज्वेलर्स मालकाकडून फसवणूक; गुन्हा दाखल; शोध सुरू

पनवेल : वार्ताहर

कामोठे भागातील एका ज्वेलर्स दुकान मालकाने दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने कामोठे भागातील आठ व्यक्तींजवळचे लाखो रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन आपले दुकान बंद करून पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संतोष पवार असे या ज्वेलर्स दुकान मालकाचे नाव असून कामोठे पोलिसांनी त्याच्यावर फसवणकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.  या घटनेतील फरार झालेला एस.एस.ज्वेलर्सचा मालक संतोष पवार हा कामोठे सेक्टर-10 मध्ये राहाण्यास होता. तसेच त्याने कामोठे सेक्टर-7 मधील एक्सिस बँकेच्या बाजुला आपले एस.एस.ज्वेलर्स हे दुकान उघडले होते. त्याच भागात राहणार्‍या हर्षल जाधव याचे लग्न असल्याने त्याने 2019 मध्ये गंठण व हार बनविण्यासाठी दिले होते. त्यानुसार संतोष पवार याने हर्षलला लग्नासाठी दागिने बनवून दिले होते. मात्र, लग्न झाल्यानंतर संतोष पवार याने दागिने काही काळानंतर फिके पडतील असे सांगून त्याबदल्यात दुसरे दागिने देण्याच्या बहाण्याने हर्षलकडे दागिने मागून घेतले. त्यावेळी हर्षलनेदेखील त्याच्यावर विश्वास ठेवून सहा लाख 29 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र व हार संतोष पवार याला दिले होते.  यानंतर हर्षल जाधव व त्याच्या कुटुंबीयांनी संतोष पवार याच्याकडे आपल्या दागिन्यांची वारंवार मागणी केली, मात्र त्याने वेगवेगळी कारणे सांगून दागिने देण्यास टाळाटाळ केली.  कालांतराने फोन घेणे बंद केले. त्यामुळे हर्षलने गत ऑक्टोबर महिन्यात त्याच्या दुकानावर जाऊन पाहणी केली असता, संतोष पवार याने पलायन केल्याचे समजले. हर्षल प्रमाणेच अनेकजणांची फसवणुक संतोष पवार यांने केल्याचे समजल्यावर हर्षदसह इतर साज जणांनी कामोठे पोलीस ठाण्यात संतोष पवारविरुध्द तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संतोष पवार याच्यावर फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. 

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply