उरण : वार्ताहर
उरण येथील स्वामी विवेकानंद चौकजवळ असलेल्या टीप टॉप सुपर मार्केटचे नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते बुधवारी (दि. 23) उद्घाटन झाले. टीप टॉप सुपर मार्केटचे मालक हिरजी शिवजी चंदात व रणछोड शिवजी चंदात यांनी सर्व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले व आभार मानले. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, हिरजी शिवजी चंदात, रणछोड शिवजी चंदात, भाजप उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, उद्योजक राजा पडते, भाजपा उरण शहर व्यापारी सेल अध्यक्ष हितेश शाह, भाजप अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष जसिम गॅस, उदयोजक सुनील पेडणेकर, मनोहर सहतिया, अजित भिंडे, मनन पटेल, मदन कोळी, दिपेश मेहता, रमेश मिनात, कानजी सांढा, संतोष ओटावकर, देवेंद्र पाटील, मोहनलाल रांगी, भूपेन घरत, प्रदीप नाखवा, गिरीश परीहारीया, ओमकार स्वामी, दत्ता गोळे, अभिषेख जैन, विक्रम ठक्कर, कुणाल शिसोदिया, निलेश कदम, योगेश वैवडे आदी उपस्थित होते.