Breaking News

भाजपकडून भिसेगावमध्ये खाऊ वाटप

कर्जत : बातमीदार

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त कर्जत शहरमधील पक्ष कार्यकर्त्यांनी भिसेगावमधील आदिवासी भागात जाऊन खाऊ वाटप केले. पक्षाच्या 42 व्या स्थापनादिनाचे औचित्य साधून कर्जत शहर भारतीय जनता पक्ष आणि तालुका महिला मोर्च्याच्या वतीने भिसेगाव आदिवासीवाडीवर पौष्टीक आहाराचे वाटप करण्यात आले. भाजपचे कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, तालुका सरचिटणीस राजेश भगत, संजय कराळे, किसान मोर्चाचे कोकण संघटक सुनील गोगटे, महिला मोर्चाच्या रायगड जिल्हा चिटणीस बिनीता घुमरे, कर्जत तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे, तालुका सरचिटणीस वर्षा बोराडे, कोकण प्रसिद्धी प्रमुख गायत्री परांजपे, सरस्वती चौधरी आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. भाजपचे मारुती जगताप, हरेश ठाकरे, मिलिंद खंडागळे, दिनेश भरकले, सर्वेश गोगटे यांनी आदिवासी समाजातील मुलांना खाऊचे वाटप केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply