Breaking News

मुरूडमधील ‘ते’ बांधकाम होणार जमीनदोस्त

भाजपच्या प्रयत्नाला यश; बेमुदत उपोषणाची सांगता

मुरुड : प्रतिनिधी – शहरातील शेंगवाडा येथील नाल्यावरील बांधकाम तोडावे, या मागणीसाठी त्या परिसरातील नागरिकांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. मात्र प्रशासकीय अडचणीमुळे नगर परिषदेला नाल्यावरील बांधकाम तोडता येत नव्हते. भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करुन  जिल्हाधिकारी यांची भेट घेतली व नाल्यावरील तोडण्यासाठी  आदेश देण्याची मागणी केली. त्यानंतर लोकहितार्थ उचित निर्णय घेण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी मुरुड नगर परिषदेला दिले. त्यामुळे समाधान झालेल्या उपोषणकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 5) संध्याकाळी अ‍ॅड. मोहिते यांच्या हस्ते फळाचा रस घेऊन उपोषण सोडले.

अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या सहकार्य लाभल्यानेच  जिल्हाधिकारी यांच्याकडून पत्र मिळू शकले. शेगवाडा परिसरातील सर्व नागरिक त्यांचे ऋणी राहतील, असे शेगवाडा पाखाडी अध्यक्ष सुधीर पाटील यांनी यावेळी सांगितले. भाजपचे ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे, अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ सरचिटणीस अ‍ॅड. परेश देशमुख, मुरुड शहर अध्यक्ष प्रवीण बैकर, उपाध्यक्ष महेश मानकर, बाळा भगत, जगदीश पाटील, अशील ठाकूर यांच्यासह शेगवाडा परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. नाल्यावरील बांधकाम तोडण्यासाठी सोमवारी सर्व नगरसेवकांची सभा लावण्यात आली असून, या सभेत तातडीने नाल्यावरील बांधकाम तोडण्याचा ठराव पारित करण्यात येईल.

-स्नेहा पाटील, नगराध्यक्षा, मुरुड

भाजपकडून नेहमीच जनतेच्या हिताची कामे करण्यात येतात. नाल्यावरील बांधकाम तोडण्यासाठी लागणारा सर्व खर्च जिल्हा नियोजन मंडळाकडून देणार आहोत. या कामासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोठे सहकार्य केले आहे.

-अ‍ॅड. महेश मोहिते, अध्यक्ष, अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ भाजप

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply