Breaking News

पोलादपूरमध्ये तीन लाखांची रोकड जप्त

पोलादपूर : प्रतिनिधी

रायगड लोकसभा मतदारसंघातील आचारसंहिता स्थिर सर्व्हेक्षण पथकाच्या टीमला पोलादपूर येथे एका वाहनात तीन लाखांची रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम जप्त करण्यात आली असून, ती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आली आहे. पुढील कार्यवाही होण्यापूर्वी या रकमेच्या वैधतेची खातरजमा करण्यात येणार आहे. पोलादपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि पोलादपूर ते वाई सुरूर राज्यमार्गावर निवडणूक आयोगाने नेमलेले रायगड लोकसभा मतदारसंघातील आचारसंहिता स्थिर सर्व्हेक्षण पथक वाहनांची तपासणी करीत होती. या पथकाचे प्रमुख आर. बी. किरकिरे, पाटील आणि पोलीस कर्मचारी चिरमुरे यांना मंगळवारी रात्री वॉक्सवॅगन कार (एमएच 43-बीएम 3774)ची झडती घेताना सोनूकुमार राजनारायण पटेल या व्यक्तीकडे तीन लाखांची रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम जप्त करण्यात आली असून, त्याचा अहवाल पोलादपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी महाडचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना देऊन त्याची प्रत पोलादपूर तहसीलदार कार्यालयाकडे माहितीसाठी पाठविली आहे.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply