Breaking News

बारणेंच्या विजयासाठी जगताप सरसावले

पिंपरी : रामप्रहर वृत्त

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य देण्यासाठी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप सरसावले आहेत. बूथस्तरावर काम करून प्रत्येक प्रभागातून महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य मिळाले पाहिजे. त्यादृष्टीने कामाला लागा. पदयात्रा काढा, कोपरा सभा, बैठक घ्या, अशा सूचना आमदार जगताप यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आमदार लक्ष्मण जगताप यांनी बैठक घेण्याचे सत्र सुरू केले आहे. प्रभागनिहाय बैठका घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना जगताप मार्गदर्शन करीत आहेत. प्रचाराची रणनीती सांगत आहेत. प्रभाग क्रमांक 17 वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगर, प्रेमलोक पार्क अशा चार बैठका  आमदार जगताप यांनी गुरुवारी (दि. 11) घेतल्या. उपमहापौर सचिन चिंचवडे, विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी, नगरसेवक नामदेव ढाके, नगरसेविका करुणा चिंचवडे, रघुनाथ वाघ, बुथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, केंद्र, राज्य आणि महापालिकेतील भाजप-शिवसेना सरकारच्या लोकोपयोगी योजना, निर्णय, उपक्रम, विकासकामे कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावीत. त्या अनुषंगाने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. संपर्क करा. जनसंपर्कावर भर द्या. नवमतदारांना भाजप-शिवसनेकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे अशा मतदारांपर्यंत पोहचा. मतदानाच्या दिवशी त्यांना सकाळी लवकर मतदानासाठी बाहेर काढा.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply