Breaking News

ऑनलाइन काव्यसंमेलनाचा दशकपूर्ती सोहळा

मान्यवर साहित्यिकांची मांदियाळी

माणगाव : प्रतिनिधी – कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्याचा मधुघट या समुहातर्फे नुकतेच ऑनलाइन कविसंमेलन पर्वाचा दशकपूर्ती सोहळा राज्यातील मान्यवर कवींच्या सादरीकरणाने समृद्ध झाला. या कविसंमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘कोमसाप’च्या केंद्रीय अध्यक्ष अशोक ठाकूर, विशेष निमंत्रित कार्याध्यक्ष नमिता किर, स्वागताध्यक्ष दक्षिण रायगड अध्यक्ष संजय गुंजाळ उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जनसंपर्क प्रमुख एल. बी. पाटील, केंद्रीय संमेलनप्रमुख सुधीर शेठ, वाङ्मयीन प्रमुख सुनंदा देशमुख, उत्तर रायगड अध्यक्ष सुधाकर चव्हाण, सुखद राणे, गणेश कोळी उपस्थित होते.

श्रद्धा वैशंपायन हिच्या सुमधूर स्वरातील गणेश वंदनेने काव्यसंमेलनाला शुभारंभ करण्यात आला.प्रास्ताविकात संयोजक तथा तळा शाखाध्यक्ष  हेमंत बारटक्के यांनी काव्यमयी रूपात कवितेचे महत्त्व मांडून सर्वांचे स्वागत केले. सुधीर शेठ यांनी मधुभाईंच्या शुभेच्छापत्राचे वाचन करून उद्घाटन केले. नमिता किर, संजय गुंजाळ, सुधाकर चव्हाण, सुखद राणे यांनीही समयोचित मनोगत मांडले.

या काव्यसंमेलनात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे, दिलीप पांढरपट्टे, दुर्गेश सोनार, अनुपमा उजगरे, एल. बी. पाटील, साहेबराव ठाणगे, दादा मडकईकर, रुजारिओ पिंटो, मधुसूदन नानिवडेकर, राजीव जोशी, नारायण लाळे, भरत दौंडकर यांनी आपल्या विविध विषयांवरील आशयघन कविता व गझलांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.कविसंमेलनाचे निवेदन कवी अजित शेडगे यांनी केले, तर आभार गझलकार सिद्धेश लखमदे यांनी मानले.

Check Also

रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी …

Leave a Reply