बॉक्सिंग चॅम्पियनशिपला खेळाडूंचा प्रतिसाद
पनवेल, उरण : वार्ताहर
महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने सब ज्युनिअर व ज्युनिअर कन्या चॅम्पियशनशिप जेएनपीटीच्या सहकार्याने उरण येथील जेएनपीटी वसाहत बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला खेळाडूंचा प्रतिसाद मिळाला.
बेटी बचाओ बेटी पढावो यावर आधारित बॉक्सिंग स्पर्धेत राज्यातील 300 खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये रायगड जिल्ह्यातून मधुरा पाटील हिने सुवर्णपदक पटकाविले.
स्पर्धेचे उद्घाटन जेएनपीटीच्या मार्केटिंग मॅनेजर अंबिका सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभास कॅप्टन अमित कपूर (डायरेक्टर कन्सरवेटर ऑफ जेएनपीटी), जयवंत धवाले (चीफ मॅनेजर अॅडमिन जेएनपीटी), अंकिता मयेकर (डिस्ट्रीक्ट स्पोर्ट्स ऑफिसर रायगड) आदी उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव अद्वैत शेंबवणेकर व सहकार्यांनी मेहनत घेतली.