माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिका क्षेत्रातील अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. या अंतर्गत पेंधर गावात महापालिकेच्या माध्यमातून 78 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी (दि. 19) माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले.
पनवले महापालिकेच्या माध्यमातून पेंधर गावातील विठ्ठल मंदिर ते गावदेवी मंदिरपर्यंतच्या रस्त्याचे आणि गटारांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी 78 लाख रुपयांचा निधी वापरण्यात येणार आहे. या विकासकामांचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
भूमिपूजन समारंभास माजी नगरसेवक हरेश केणी, संतोष भोईर, खेरणेचे सरपंच शैलेश माळी, युवा मोर्चाचे दिनेश खानावकर, माजी सरपंच नितीन भोईर, दत्तात्रय भोईर, सोपान नेरुळकर, डॉ. भगवान कोपरकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.