Breaking News

कोरोना देवदूतांवर काळाचा घाला

सुशांत मोहिते, प्रथमेश बहिरा यांचा अपघाती मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोरोना संकटकाळात रुग्णांच्या मदतीसाठी रात्रंदिवस धावणारे भाजपचे युवा नेते व पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत मोहिते आणि प्रथमेश बहिरा यांचा विचित्र अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पनवेलजवळ किमी 8 येथे मुंबईच्या दिशेने जाणार्‍या एका स्विफ्ट कारला कंटेनरने मागून धडक दिली होती. त्याचदरम्यान तेथून जात असलेले पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिळे, भाजप युवा नेते तथा पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत मोहिते, प्रथमेश बहिरा व हर्षद खुटकर हे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी आपली मर्सिडीज गाडी घेऊन थांबले होते. त्या वेळी अचानक मागून आलेल्या आयशर टेम्पोने मर्सिडीजला धडक दिली. या धडकेत सुशांत मोहिते (वय 26) आणि प्रथमेश बहिरा (वय 24) यांचा मृत्यू झाला. हर्षद खुटकर जखमी झाले असून, त्यांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर नगरसेवक तेजस कांडपिळे बचावले आहेत.
दरम्यान, भाजप युवा कार्यकर्त्यांच्या अपघाती निधनाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर आदी लोकप्रतिनिधींनी शोक व्यक्त केला आहे.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply