पनवेल ः आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास पनवेलमधील मिडल क्लास हौसिंग सोसायटीमधील श्री गणेश मंदिरापासून सुरुवात झाली. या सोहळ्यास मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला ठाकूर उपस्थित होत्या. या सोहळ्यास छाया म्हात्रे, रूपा कांडपिळे, प्रतिभा दळवी, सुमेधा गुरुजी, अश्विनी खेडकर, अलका जैतपाल, संध्या दांडेकर, रेखा जोशी, हेमलता जैतपाल, जयाबेन सोमैया आदी उपस्थित होत्या.
भंगारपाडा जिल्हा परिषद शाळेत वह्यावाटप कार्यक्रम
पनवेल ः तालुक्यातील भंगारपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने शनिवारी वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पनवेल महापालिकेचे नगरसेवक विकास घरत यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी मच्छिंद्र कटेकर, अमोल गव्हाणकर, लक्ष्मी गोसावी, कृपा कटेकर, गुरुनाथ गोसावी, केशव दमडे, समीर कटेक, मनोहर दमडे, रोशन दमडे, सचिन दनडे, एकनाथ गोसावी, गजानन कटेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
संत साईबाबा स्कूलमध्ये वह्यावाटप कार्यक्रम
नवीन पनवेल ः श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने संत साईबाबा स्कूलमध्ये नगरसेवक प्रकाश बिनेदार, नगरसेविका वृषाली वाघमारे, अॅड. जितेंद्र घरत, वॉर्ड अध्यक्ष विजय मात्रे, सी. सी. भगत, विनोद वाघमारे, राजेंद्र घरत यांच्या उपस्थितीत वह्यावाटप करण्यात आले.