Breaking News

‘वळण‘ ची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड

दिग्दर्शक प्रदिप गोगटे यांच्या उत्कर्ष इव्हेंट्स प्रॉडक्शन्सची गरुडझेप

कडाव : प्रतिनिधी

येथील दिग्दर्शक प्रदिप गोगटे यांच्या संकल्पनेतून उत्कर्ष इव्हेंट्स प्रॉडक्शनने साकारलेल्या ‘वळण‘ या शॉर्टफिल्मची नवादा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्थरांतून कौतुक होत आहे.    

वळण या शॉर्टफिल्ममध्ये स्थानिक कलाकारांचा सहभाग असून या शॉर्टफिल्मचे संपूर्ण शुटिंग कर्जतच्या ग्रामीण भागात झाले आहे. यामध्ये ऋत्वी ओसवाल, आरवी ओसवाल, राज साळवी, स्पंदन पडते, साईराज खंडागळे, राजवी डोंबे आणि स्फूर्ती पडते या बालकलाकारांसह  पूजा बंदरकर, विशाल रोकडे, आरती मॅडम, दिगंबर म्हसकर, शर्वरी जाधव आणि हेमंत वाघुले यांनी भूमिका साकारल्या आहेत.

वळणची कथा व दिग्दर्शन प्रदिप गोगटे यांचे असून या शॉर्टफिल्मसाठी जितेंद्र ओसवाल, मनोज ओसवाल, महेश वैद्य, मुकेश सुर्वे, सुवर्णा जोशी, सतिश श्रीखंडे, दीपक बडगुजर यांनी मदतीचा हात दिला. या शॉर्टफिल्मसाठी आनंद कानडे, कृष्णा ठोंबरे, चंद्रकांत जाधव, सुर्वे सर, कांचन थोरवे, सायली महाडिक, सौरभ तेलवणे, मंदार मुरकुटे, दिनेश कडू, शुभांगी कडू, इको ग्रीन सोसायटी, रमाकांत पाटील, लक्ष्मण मंडावळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

वळणमध्ये स्थानिक बालकलाकारांना संधी देण्यात आली आहे. शॉर्टफिल्मची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाल्याने खूप समाधान मिळत आहे.

-प्रदिप गोगटे, दिग्दर्शक, ‘वळण‘ शॉर्टफिल्म

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply