पेण येथील तरूणांचा स्तुत्य उपक्रम
पेण : प्रतिनिधी
कोरोनामुळे सर्वसामान्य कुटुंबांची वाताहात झाली आहे. काहींना एका वेळचे जेवणही मिळेनासे झाले आहे. या पार्श्वभूमीवर पेणमधील काही तरूणांनी एकत्र येऊन अन्नदानासारखा उपक्रम हाती घेतला आहे.
पेणमधील अच्युत पाटील, राहुल शहाणे, आनंत बारमुख, आदित्य टेमघरे, मनिष कुंभार या मित्रांनी एकत्र येऊन पेणमधील बालाजी कॉम्प्लेक्सजवळ दररोज दुपारी 12 ते 2 या वेळेत सुमारे 70 ते 100 गरीब व गरजू लोकांना भात, भाजी, वरण व फळ यांचे वाटप करण्याचे सामाजिक कार्य हाती घेतले आहे. या तरुणांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.