मुरुड पोलिसांकडून सहकार्य करण्याचे आव्हान
मुरुड : प्रतिनिधी
रायगड जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये मुरुडमध्ये बुधवार (दि. 21) पासून कोरनाविषयक नवीन नियमांचे पालन करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार मुरूड शहरात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच दुकाने चालू ठेवण्यात आली होती.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण आणण्याकरिता राज्यात कडक लॉकडाऊन करून त्याची नियमवाली जाहीर करण्यात आली आहे. नवीन नियमावलीनुसार सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. त्यांची माहिती पोलिसांच्या गाडीतून लाऊडस्पिकरद्वारे संपूर्ण मुरूड शहरात देण्यात आली. मुरूड पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम काबंळे, उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस नाईक किशोर बठारे, शिपाई परेश म्हात्रे, धनंजय पाटील, उमेश शिंदे, प्रशांत लोहार, होमगार्डस सार्थक शेडगे यांच्यासह पोलीस कर्मचारी शहरात फिरून दुकानदारांना नवीन नियमांची माहिती देत होते. त्याला प्रतिसाद देवून शहरातील दुकानदारांनी बुधवारी आपली दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत उघडी ठेवली होती.
वाहनचालकांनी विनाकारण रस्र्यावर फिरू नये, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक कांबळे यांनी दिला आहे.
कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन करून नियमवाली जाहीर करण्यात आली आहे. त्या नियमांचे पालन करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
-परशुराम काबंळे, पोलीस निरीक्षक, मुरूड