Breaking News

आपटा आरोग्य केंद्रात सुविधांची वानवा

नियोजनशुन्य कारभाराने रुग्णांची हेळसांड

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोविडची दुसरी लाट झपाट्याने वाढत असताना आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रात याबाबत कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने येथे कोणतीही उपाययोजना केलेली नसून येणार्‍या रुग्णांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे.

आरोग्य केंद्रात रुग्ण आला तर ऑक्सिजन तपासण्यासाठी असणारे ऑक्समिटरही बंद अवस्थेत असल्याचे पहावयास मिळाले, तर कोविडविरोधी लस घेण्यासाठी येणार्‍या लोकांना रुग्णालयात पोहचल्यावर समजते लस संपली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याबाबत विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. कोविड तपासणी करण्यास आले, तर स्व्याब टेस्ट किट संपलेले असतात. ते असले तर तपासणारा जागेवर नसतो.

पनवेल तालुक्यातील आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत गुळसूनदे, आकुलवाडी, आपटा, चावणे, कराडे, सवणेपासून ते कर्नाळा ग्रामपंचायतीमधील डोलघर, तारा, बारापाडा, कल्हे, बांधनवाडी, अशा पंधरा  गावांसह 26 आदिवासी वाड्या समाविष्ट आहेत. ह्या आदिवासी समाजाला आपटा प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे हक्काचे एकमेव सरकारी दवाखाना असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दर्याखोर्‍यातील ठाकूर आणि कातकरी आदिवासी समाज पेण पनवेलला जाण्याऐवजी आपट्याला जाऊन औषधोपचार घेण्यास प्राधान्य देतो, मात्र सध्या ह्या या आता प्राथमिक आरोग्य केंद्रात गरीब गरजू रूग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णाची  हेळसांड होत आहे.

शेजारीच असलेल्या पातळगंगा एमआयडीसीतील औद्योगिक कारखान्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी प्राधान्याने कोविड चाचण्या करणे किंवा लसिकरण करतात. त्यामुळे आधीच कमी पुरवठा होत असल्याने लस किंवा टेस्टिंग किट संपल्यामुळे डोंगरदर्यातून दोन-तीन तास पायपीट करून आलेल्या ग्रामीण रुग्णाला मात्र चाचणी किंवा लसीविणाच घरी परतावे लागत असल्याचा आरोप आदिवासी रुग्ण करत आहेत. कारखान्यातील कामगारांचे लसीकरण आणि चाचण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, आरोग्य केंद्रात लसीकरण आणि चाचण्याबाबत कोणतेही सूचना फलक अथवा आगाऊ सूचना देण्याची व्यवस्था नसल्याने रोज सकाळी दीडशे ते दोनशे नागरिकांची गर्दी पहावयास मिळते.

कामगारांसाठी स्वतंत्र केंदाची मागणी

 शेजारीच असलेल्या पातळगंगा एमआयडीसीतील औद्योगिक कारखान्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी प्राधान्याने कोविड चाचण्या करणे किंवा लसीकरण करतात. त्यामुळे आधीच कमी पुरवठा होत असल्याने लस किंवा टेस्टिंग किट संपल्यामुळे डोंगरदर्यातून दोन-तीन तास पायपीट करून आलेल्या ग्रामीण रुग्णाला मात्र चाचणी किंवा लसीविणाच घरी परतावे लागत असल्याचा आरोप आदिवासी रुग्ण करत आहेत. कारखान्यातील कामगारांचे लसीकरण आणि चाचण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे.

 याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने आरोग्य केंद्रामधील व्यवस्थापनाकडे  विचारणा केली असता अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने आमच्यावरही अधिकचा ताण येत असल्याचे तेथील कार्यरत वैद्यकीय कर्मचार्‍यांनी सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply