मुंबई ः प्रतिनिधी
राजस्थान रॉयल्सची ह्या आयपीएल सीझनमधील आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक झाली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारी ही टीम सध्या पॉइंट टेबलमध्ये सर्वांत तळाशी आहे.आजवरच्या आयपीएल लिलावातील मॉरीस हा सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे, मात्र मॉरीस या रकमेसाठी पात्र नाही, असे मत इंग्लंडचा माजी कॅप्टन केव्हिन पीटरसनने व्यक्त केले आहे. मॉरीसने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धची मॅच जिंकून दिल्यानंतरही पीटरसनने हे मत व्यक्त केले यावरून तो मॉरीसवर नाराज असल्याचे स्पष्ट होते.
राजस्थानला चारपैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. आयपीएलपूर्वी राजस्थानने मोठी तयारी केली होती. आयपीएल लिलावात त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर ख्रिस मॉरीसला तब्बल 16.25 कोटी रुपयांना खरेदी केले. पीटरसनने एका कार्यक्रमात सांगितले की, मॉरीस दक्षिण आफ्रिकेच्या टीमची पहिली पसंती नाही. त्याच्याकडून सर्वांच्या जास्त अपेक्षा आहेत. त्याच्याबद्दल खूप काही सांगितले जात आहे, पण माझ्या मते तो सतत चांगली कामगिरी करू शकणारा खेळाडू नाही. त्याच्यात काहीही खास नाही. तो फक्त दोन मॅचेस चांगल्या खेळू शकतो. त्यानंतर पुढच्या मॅचमध्ये त्याची कामगिरी खराब असेल.
पीटरसन इतक्यावरच थांबला नाही. तो पुढे म्हणाला की, राजस्थानने मॉरीससाठी जास्तच पैसा खर्च केला. हे थोडे खराब वाटेल, पण माझ्या मते तो इतक्या पैशांसाठी पात्र नाही.
आरसीबीविरुद्ध मॉरीस फेल
ख्रिस मॉरीसने गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये सपशेल निराशा केली. तो 7 चेंडूंमध्ये 10 धावा काढून बाद झाला. त्यानंतर त्याने तीन षटकांमध्ये 12.66च्या इकॉनॉमी रेटने 38 धावा दिल्या. आरसीबीविरुद्ध त्याला
एकही विकेट मिळाली नाही. देवदत्त पडिक्कल (101) आणि विराट कोहली (72) या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर आरसीबीने राजस्थान रॉयल्सचा 10 विकेट्सने पराभव केला.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …