महाड ः प्रतिनिधी
महाड-रायगड महामार्गावर रविवारी (दि. 2) तेटघर गावच्या हद्दीत भरधाव वेगाने कार चालवत असताना ती पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज राजेंद्र शिंदे (30, रा. कांबळे तर्फे बिरवाडी) हा तरुण त्याच्या ताब्यातील कारने (एमएच 06 बीयू 6048) नातेगावाहून महाडच्या दिशेने येत होता. या वेळी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास तेटघर फाटा येथील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सुरजचा मृत्यू झाला.
या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात चालकाविरोधात भा. दं. वि. कलम 304 अ, 337, 338, 304, 279, मोवाका 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.