नागोठणे ः प्रतिनिधी
राज्यात 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातसुद्धा ही आरोग्य मोहीम राबविली जात आहे. याचा जास्तीत जास्त प्रसार होऊन रायगड जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी जिल्ह्यात नावाजलेल्या व्यक्तींकडून या संदर्भात आवाहन करण्यात येत असून, त्या अनुषंगाने नागोठणे येथील आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू, शिवछत्रपती राज्य क्रीडा एकलव्य पुरस्कारप्राप्त संदीप गुरव यांचीही निवड झाली आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गुरव यांनी व्हिडीओ क्लिपद्वारे जिल्ह्यातील जनतेला आवाहन केले आहे. ही क्लिप जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अधिकृत फेसबुक साइटवरसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे.