
रेवदंडा ः प्रतिनिधी
संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन आयोजित शाखा भिलजी अंतर्गत मिठेखार येथे रविवारी (दि. 22) सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर पार पडले. या भव्य रक्तदान शिबिर उद्घाटनप्रसंगी संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे संयोजक झोनल इन्चार्ज प. आ. विजय आहेर, मुखी प. आ. सुरेश गावंड, संचालक प. आ. महेशवर शिंदे, स. संचालिका प. आ. योगिनी तांबडे, शिक्षक प. आ. दीपक भोनकर, तसेच प्रमुख अतिथी मिठेखार ग्रा. पं. सरपंच सुवर्णा दिवेकर, उपसरपंच राकेश तांबडे, मिठेखार सत्संग आयोजक मिलिंद पाटील, मिठेखार येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन ठाकूर, भिलजी ब्रँच सत्संग व सेवादल यु. न. 1447 आदी उपस्थित होते. या संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन आयोजित भव्य रक्तदान शिबिरास जिल्हा शासकीय रक्तपेढी अलिबाग-रायगडचे सहकार्य लाभले होते. यामध्ये रक्तपेढी संक्रमण अधिकारी डॉ. दीपक गोसावी, तंत्रज्ञ सुनील बंदिखोडे, नालुका काटे, काजल नाईक, महेश घाडगे, संकेत घरत आदींनी विशेष परिश्रम घेतले. या विशाल रक्तदान शिबिरात एकूण 115 जणांनी रक्तदान केले.